चोराच्या सुलट्या बोंबा-भाग १
चोराच्या सुलट्या बोंबा-भाग-१
विशेष
सूचना
१. हा
लेख कोणत्याही
विशीष्ट व्यक्तीच्या
प्रेरणेने लिहीलेला
नाही.किंबहुना
अशा विषयावरही
आपण लिहू
शकतो का
याचा केलेला
हा प्रयोग
आहे.
२. हा
विषय फारसा
विनोदी लिहीण्यासारखा
नाही तरी
`जमला नाही’,`कुठे
हसायचे ते
अधोरेखीत करून
द्या’,`ह्या
वेळेस मुड
नव्हता वाटत’
असले अभिप्राय
देऊ नये.
चोरी ही एक प्राचीन कला असून त्याचे दाखले अगदी पुरातनकाळापासून दिले जातात.इजिप्तमधील काही ममी देखील (मृत्युनंतर अनेक रासायनिक प्रक्रीया करून जतन केलेले शव…मातेला हाक मारायचे इंग्रजाळलेले नाव नव्हे..) त्याकाळात केलेल्या चोरी प्रकरणातली शिक्षा भोगण्यासाठी जिवंतपणे गाडल्या गेल्याची उदाहरणे आहेत.
या अश्मकालीन युगापासून चालत आलेल्या व ज्याला पुराणांमधे स्थान मिळाले आहे अशा `चौर्यकर्मा’ला आमचा त्रिवार मुजरा…तसेच ह्याच कर्मासाठी पुराणांपासून लिहून ठेवलेल्या व आजतागायत चालू असलेल्या `दंडप्राविधाना’चा तीव्र निषेध.
हस्तकला,शिल्पकला,चित्रकला,गायनकला,नृत्यकला,अभिनयकला ह्या सगळ्या कला..कलाकार यातून निर्माण होणा-या कलाकृतीचा स्वतः तर आनंद घेतोच पण दुस-यालाही आनंद देतो… या कला तुमच्यात उपजत तर असाव्याच लागतात पण त्याचबरोबर आयुष्यभराच्या सरावामुळे,मेहनतीमुळे त्या कलेला अनेक पैलू पडतात व कलाकार त्यात पारंगत होत जातो.देशाविदेशात त्याला कला दाखविण्याची संधी मिळते…प्रसिद्धी मिळते.. सोबत पैसाही मिळतो…
मग ...चोरी ही कला का नाही..? ती कला काय तुमच्यात (तुमच्यात म्हणजे चोरी करणा-यात) उपजत असावी लागत नाही..? गैरसमजात असाल तर निधड्या छातीने साधं बायकोच्या पर्समधलं टिकल्यांचं पाकीट गहाळ करून दाखवा…आहे बिशाद हात लावायची तरी…अहो उलट चोरीइतकी मेहनत इतर कुठल्याही कलेत घ्यावी लागत नाही…शिवाय इतर कलांना तुम्हाला शौर्य,धाडस व वेळप्रसंगी प्राण पणाला लावावे लागत नाहीत…आयुष्यभराच्या चोरीच्या सरावामुळे ह्या ही कलेत वेगळे पैलू पडतात,देशविदेशात संधी मिळते,प्रसिद्धी मिळते (काही तद्द्न फालतू व्याकरणकारांनी या प्रसिद्धीच्या मागे ‘कु’ लावून त्याला कु-प्रसिद्धीचा कुळाचार केला याचाही निषेध…)..आणि हो सोबत पैसाही मिळतो…फक्त समाजमान्यता नसलेली कला असल्याने ह्या पैश्यात वाटेकरी वाढतात हाच काय तो दुर्देवाचा भाग…आणि हो या चोरी कलाप्रकारातही कलाकाराला मनापासून आनंद मिळतो..आणि चित्रपटात दाखवलेली चोरी पाहताना दुस-यालाही आनंद मिळतो हे उघड आहे.त्यामुळे चोरी ही कला आहे हे मान्य व्हायलाच पाहिजे..
त्यामुळेच काही वर्षांपुर्वी ठरवलं..पैसा,नाव खुप कमावला…आता चोरीच्या या कलेला इतर कलांप्रमाणे आदराचे स्थान मिळवून द्यायचे..आपण जिच्या जिवावर लहानाचे मोठे झालो..कंगाला पासून राजे झालो त्या आपल्या या प्राणप्रिय कलेला पुढच्या पिढ्यांकडे पोहोचवण्याचे सामाजिक कार्य आपल्या हातून आता झाले पाहिजे.या जगात अनेक असे होतकरू तरूण आहेत ज्यांना आज प्रामाणिकपणे चोरी करून मोठे व्हायचे आहे.पण त्यांच्यापुढे मार्गदर्शन नाही..त्यांना जर आज चांगला मार्ग दाखविणारा हात मिळाला तर ही नवीन चुणचुणीत पिढी कुठल्या कुठे निघून जाईल..चोरी करण्याच्या निमीत्ताने अनेक मोठ्या मोठ्या लोकांशी संबंध आले.यातील बरेचशे आपल्यासारख्याच पण थोड्या सॉफीस्टीकेटेड चो-याच करून मोठे झाले आहेत हे त्यांच्या घरांमधे चोरी करताना ऑन ड्युटी फिरल्यावर समजले. ह्या सगळ्यांच्या संबंधांचा उपयोग आजच्या होतकरू चोर बांधवांना कसा करून द्यावा त्यासाठी मन खात होते.
याच विचारातून मग जन्म झाला आमच्या `*अखिल
भारतीय चोरनिर्माण
निवासी महाविद्यालया*’चा..येथे १ ली ते पदव्योत्तर पर्यंतचे सर्व वर्ग घेतले जातात.संपूर्ण भारतभरातून सुमारे ६०० होतकरू विद्यार्थी येथे निवासासाठी येतात आणि त्यांना चोरीच्या बाळकडू पासून ते निष्णांत चोरीपर्यंतचे सर्व व्यावसायीक प्रशिक्षण अतिशय माफक दरात दिले जाते. इथे येणारे बहुतांशी मुलं ही पालकांना मुलगा चोरीच्या भावनेने प्रेरीत व सदरील कामात नैसर्गिक गती वाटल्याने आलेले असतात. अनेकदा ह्या मुलांनी कुठलेही प्राथमिक शिक्षण नसतानाही ह्या व्यवसायातील चुणूक घरच्या घरी अथवा नातेवाईक,शेजारी आप्तेष्ट ,मित्रमंडळ यांच्या कडे दाखविलेली असतेअशा मुलाला सतत दुस-याच्या वस्तू चांगल्या व हव्याहव्याश्या वाटतात. त्यामुळे घरी लाडू चोरून खाण्यापासून चालू केलेली ही कला बालवयात कृष्णाच्या दही चोरण्याच्या लिलेशी झालेल्या कौतुकमिश्रीत तुलनेत फार गांभीर्याने पालक घेत नाहीत आणि परिणामी मग हळूहळू मातेच्या पर्स मधील रुपया,शाळेतील मास्तरांच्या खिशातले पेन, बाईंच्या पर्समधील गोल फिरवून बाहेर येणारी लिपस्टीक,कोप-यावरील वाण्याच्या दुकानातील डब्ब्यात पडून पडून खराब होऊ नयेत ह्या निव्वळ सामाजिक कर्तव्यातून घरच्या डब्ब्यात आलेली बिस्कीटे, आंबा पिवळा होण्याआधी हिरवा का असतो ह्या विषयी शास्त्रीय माहिती घेण्यासाठी तोडून आणलेल्या पोतेभर कै-या,वडिलभाऊ पावसाळ्यात भिजत शाळेत जातो म्हणून त्याच्या प्रेमापोटी पळविलेला मित्राचा रेनकोट आणि जो त्याला कदाचित दुस-याचा घालायला आवडणार नाही ह्या भितीपोटी मग स्वतःच केलेला स्वच्छंद उपभोग, मुक्या जनावरांच्या प्रेमापोटी व शाळेत त्यांच्यावर निबंध लिहायला सांगितला म्हणून सतत निरीक्षण करून लिहीतायावे ह्या एकमेव प्रामाणिक व शैक्षणीक उद्देश्याने शेजारील घरातून पळवून आणलेल्या कोंबड्या व बक-या असा वरचेवर आलेख वाढत जातो आणि एक दिवस पालकांना मुलगा आता चोरनिर्माण संस्थेत
घालण्याच्या योग्यतेचा झाल्याची खात्री पटते. या सगळ्या उपजत कलागुणांमुळे मुलांमधे चोरीच्या अभ्यासक्रमाविषयी आवडी निवडी निर्माण कराव्या लागत नाहीत तर फक्त जोपासाव्या आणि विकसीत कराव्या लागतात. चोरी करण्याची सवय अशाप्रकारे लहानपणापासूनच लागलेली चांगली.मोठेपणी तत्व,संस्कार वगैरे असंस्कृत बाबी मुलाच्या प्रगतीच्या आड येतात आणि भरभराट होत नाही.
या संस्थेत येणा-या विद्यार्थ्याचे प्राथमिक शिक्षण जवळपास झालेलेच
असते.ब-याचदा त्याची प्राथमिक चाचणी घेऊन
लवकरच माध्यमिक शिक्षणासाठी उचलले जाते. यात ५ रू,१० रू च्या नाण्यांपासून मग पुढे वडीलांच्या पाकीटातील शंभर रूपयाच्या नोटेपर्यंत चे चौर्यप्रशिक्षण प्रात्यक्षीकासोबत दिले जाते. यासोबत फेरीवाल्यांच्या गाड्यांवर अनेक वस्तूंचे भाव विचारता विचारता हळूच उचलेगिरी करण्याचेही धडे दिले जातात.ह्याच अभ्यासक्रमात देवळासमोरील चपला मारणे,गर्दीत पाकीट मारणे,मोबाईल वरचेवर उचलणे ह्यासारखी वरकरणी दिसायला अतिशय सोपी पण हातचलाखीची ( व चप्पल चोरताना पायचलाखीचीही) गरज लागणा-या कामांचे बाळकडू दिले जाते.ह्यातून विशेष प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी पुढच्या शिक्षणासाठी पात्र समजले जाऊन त्यांना पदवी शिक्षणासाठी तयार केले जाते.
पदवी शिक्षणाचा पुर्ण खर्च विद्यार्थ्याने वरचेवर चो-या करून स्वकमाईवर करणे बंधनकारक आहे व त्याला त्याच्या मिळकतीचा तपशील सादर करावा लागतो(संस्था इमारतविकासनिधी पोटी यातील १०% रक्कम ठेवते.).त्यासाठी त्यांना आठवड्यातून दोनदा दिवसा ४ तास बाहेर जाण्याची मुभा दिली जाते.तसेच महिन्यातून एकदा पुर्ण रात्र बाहेर राहण्याचीही परवानगी आहे.
पदवी शिक्षणात आधीच्या प्राथमिक व माध्यमिक सत्रात शिकलेल्या गुणांचे अवलोकन व प्रात्यक्षीका वर पहिल्या वर्षी भर दिला जातो व त्यात सफाईदारपणा आणला जातो.बारीकसारीक मुद्दे मुलांना नीट समजले नसतील तर त्यासाठी विशेष वर्ग पुढील वर्षात घेतले जातात.जसे उचलेगिरी करतांना कोणाला शंका गेल्यास निरागसतेचा आव आणण्याचा अभिनय, रंगेहात पकडले गेले तरी सुटकेचे मार्ग शोधण्यासाठी लागणारी आशावादी मानसिकता तसेच धैर्य या साठी स्वतंत्र मानसोपचारतज्ञाची नेमणूक केलेली असते .सीसीटीव्ही कॅमेरांचे वाढत्या प्रमाणामुळे निर्माण झालेल्या संभाव्य धोक्यांपासून घेण्याची काळजी,तसेच कॅमेरे निकामी करण्याचे तंत्रज्ञान हे ही ह्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले गेले आहेत.
मंगळसूत्र व चेन ओढण्यातील प्राविण्य हा विषय ऐच्छीक (ऑप्शनल) आहे व तो आपआपल्या आवडीप्रमाणे ठरविता येतो.त्याला घरफोडी व गाड्यांची चोरी हे इतर चॉईसेस आहे.दरोडे,लूटमार,बॅंक रॉबरी,ऑनलाईन फ्रॉड हे विषय मात्र पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राखीव ठेवलेले आहेत.पदवी अभ्यासक्रमातील एक सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे विवीध घोटाळ्यांमधे प्राविण्य मिळविण्यासाठी लागणा-या तंत्रज्ञानाचे औपचारीक प्राथमिक शिक्षण.यात बॅंक घोटाळा,सही घोटाळा पासून ते चारा,कोळसा घोटाळ्यापर्यंतच्या नामांकीत घोटाळ्यांचा सखोल अभ्यास केला जातो.त्यात आणली जाणारी वैवीधता,त्यासाठी लागणारे असामान्य धाडस व कर्तुत्व व सगळ्यात महत्वाचे म्हणजे अशा घोटाळ्यात नाव येऊन होणा-या कुप्रसिद्धीला निधड्या छातीने सामोरे जाण्याची नैसर्गिक प्रवृत्ती या सर्वांचेही दृकश्राव्य माध्यमातून विश्लेषण केले जाते.यासाठी त्या त्या विषयात पारंगत असणारे व स्वतः अशा घोटाळ्यांचा प्रदीर्घ अनुभव असणा-या नामांकीत व्यक्ती संस्थेत बोलाविल्या जातात.ह्या व्यक्तीही निःसंकोचपणे आपल्या घोटाळ्यांविषयी अनुभवकथन करतात.त्यातील बारकावे विद्यार्थ्यांना समजावून सांगतात.त्यानंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होतो.यात विद्यार्थांच्या मार्मिक प्रश्नांना प्रसंगी अतिशय विनोदी शैलीतही वक्ता उत्तर देतो.यामुळे घोटाळ्यांसारख्या गहन प्रश्नांवारही हलके फुलके वातावरण संस्थेत राहते व विद्यार्थ्याचा त्या विषयात पारंगत होण्याचा हुरूप वाढतो.यामुळेच ह्या संस्थेतील अनेक माजी विद्यार्थी आज केवळ भारतातच नव्हे तर पुर्ण जगात अनेक मोठमोठ्या घोटाळ्यात आपले नाव कमवत आहेत.
थोरामोठ्यांचे चरित्रवाचन व कथन हा देखील विषय येथे घेतला जातो.यात अगदी रॉबीनहूड पासून,व्हिन्सेन्झो पिपीनो,जोनॅथन वाईल्ड आदी चोरमहर्षींच्या चरित्राचे सामूहीक वाचन केले जाते.मुन्शी प्रेमचंद यांची `चोरी’ व `गबन’ तसेच काका हाथरसींची `चोरी की रपट’ ही पुस्तके वाचनालयात मुद्दाम ठेवलेली आहेत.भाषा विषयात `चोरावर मोर’,’चोर आणी वर शिरजोर’,’चोर की दाढी मे तिनका’,’चोरी और सिनाजोरी’ अशा वाक्प्रचारांवर भाषातज्ञ मुलांना मौलीक मार्गदर्शन करतात.`वेद नेले चोरून ब्रम्हा आणूनिया देसी’ अशा आरत्या म्हणून वातावरण प्रसन्न ठेवले जाते.मिरासदारांची `माझी पहिली चोरी’ ह्या कथेचा,कथाकथन स्वरूपात मुले खूप आनंद घेतात.
`चुरा के दिल मेरा’,`चोरी चोरी मेरे दिल मे समाते हो’,`चुरा लिया है तुमने जो दिलको’, या गाण्यामधून चोरी या व्यवसायाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा संस्थेचा मानस होता पण प्रत्येक गाण्यात चोरीचा संबंध `दिल’ या मानवी अवयवाविषयी प्रकर्षाने लावला गेला असल्याने नंतर ही गाणी बंद करण्यात आली कारण मानवी अवयव तस्करी हा विषय संस्थेच्या धोरणात्मक नियमावलीच्या बाहेर होता.तसेच प्रयोगाच्या तासात विद्यार्थ्यांनी `दिल चोरणे’ ह्याच विषयात पारंगत होण्याची मनिषा ठेवत शिक्षकांच्याच घराची प्रयोगशाळा करायला सुरुवात केल्याने ह्या गाण्यांच्या पठणाला पुर्णविराम लागला. अनेक चोरी विषयक चित्रपट जसे की ज्वेल थीफ,धूम,हॅपी न्यू इयर,कीक,प्लेयर्स,बंटी और बबली आदी दाखविले जातात.अमिताभ बच्चन अभिनीत आखे चित्रपट एका अस्सल चोरासाठी चोरी करतान कुठलीही शारिरीक कमी आड येत नाही ह्या प्रेरणेसाठी मुद्दाम दाखविला जातो. (`चोरी चोरी’ ,`कामचोर’,`चितचोर’ हे चित्रपट चोरीविषयावरील असल्याच्या गैरसमजातून दाखविले गेले पण त्यात चोरी या विषयावर कुठलाही प्रकाश न पडल्याने पुढच्या सत्रात त्यांना यादीतून बाहेर काढले गेले.) प्रत्येकावर एक परिक्षा घेतली जाते.या परिक्षेत प्रथम येणा-यास संस्थेतील माजी विद्यार्थ्यांनी जगाच्या पाठीवरून चोरून आणलेल्या व संस्थेस दान केलेल्या अनेक मौल्यवान वस्तूंपैकी (ज्या कोणी चोरून नेऊ नये म्हणून संस्थेच्या स्पेशल लॉकर रूम मधे आहेत) एक भेट म्हणून दिली जाते.
क्रमशः
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home